शेतकऱ्यांना जाणणारा – जाणता राजा

 

सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज्याच्या दिनांक १९ फेब्रुवारी जयंती निमित्य सर्वाना हार्दिक शुभेच्छा आणि जाणता राजास मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं कि आठवते किल्ले , लढाया , गनिमी कावा आणि मुघल. पण  छत्रपती शिवाजी महाराज्यानी शेतकऱ्यांसाठी जे कार्य केले ते सुध्दा फार महत्वपूर्ण होते आणि याची दखल आपण नक्कीच घ्यायला पाहिजे .

रयत सुखी तर राजा सुखी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे धोरण होते. शिवकालात प्रत्यक्ष शेतात राबणारा रयत हाच खरा शिवकालीन शेतीचा आधार होता व त्याचा व्यवसाय हा समाजातील महत्वाचा मानला जात होता कारण त्याचे उत्पन्न हेच राज्याचे उत्पन्न होते तसेच शेतकऱ्यांच्या युवा पिढीतून सैन्य मिळत असे म्हणून शिवाजी महाराजांनी शेतकर्यांसाठी अनेक योजना राबवल्या होत्या. त्यासाठी शिवाजी महाराजांनी जमिनीची योग्य प्रकारे मोजमाप करून त्या त्या मातीप्रमाणे जमिनीचे प्रकार करत वर्गवारी करून त्यावर पिक पाहणी करण्याची व्यवस्था केली होती आणि त्यावरच सारा आकारला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकर्यांसंदर्भात अनेक प्रकारच्या योजना आणि सवलती राबवल्या होत्या.

तळागाळाशी जाऊन शेतकऱ्यातून सैनिक तयार करून रयतेचं स्वराज तयार करण्याचा एक प्रयन्त छत्रपती शिवाजी महाराज्यानी केला होता . तो अल्पजीवी ठरला.  कारण  शेतकऱ्यांचा असा काळ आला नसावा . आज चारशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज्यानी जो  प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला  तोच आ वासून उभा आहे . तो सोडविण्याचा मार्ग शिवाजी राजांनी दाखवून दिला . अशी राजव्यवस्था तयार करायची , कि जिचा मुख्य हेतूच रयतेचं सुख  हाच आहे , जी  व्यवस्था शेतीच्या विकासाला मदद करेल आणि त्यातून पूरक व्यापार , उद्योगधंदे  याची वाढ घडूवून आणेल. राजकर्ते इतिहासात सदैव रयतेला-शेतकऱ्यांना लुटणाऱ्याचे नायक राहिले, पण रयतेचा-शेतकऱ्यांचा पहिला नायक ठरला राजा  छत्रपती शिवाजी महाराजा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकर्यांसंदर्भात अनेक प्रकारच्या योजना आणि सवलती राबवल्या होत्या त्या त्यांच्या काही पत्रांमधून आपल्याला समजते त्यातील काही सोई सवलती अशा –
● गावचा गाव फिरून तेथील शेतकरी जेवढे आहेत ते गोळा करावे कोणाकडे मनुष्यबळ आहे, बैल आहेत यांची कोणाकडे कशी व्यवस्था आहे याची विचारपूस करावी.
● ज्याच्याकडे शेत कसण्याची कूवत आहे, मनुष्यबळ आहे पण मशागतीस बैलजोड़ी नाही, बी – बियाणे नाहीत त्याला दोनचार बैल देण्यास रोख रक्कम द्यावी किंवा सरकारातून बैल आणि बी – बियाणे द्यावेत.
● शेतकर्यास सरकारातून दिलेले कर्ज वाढीव पद्धतीने वसूल न करता त्याच्या शेतीचे उत्पन्न तयार झाल्यावर त्याच्या कुवतीनुसार हप्त्याने वसुल करावे.
● नवीन शेतकर्यास सोईसवलती देऊन पडिक जमीन लागवडीखाली आणावी त्यासाठी सरकारने रक्कम मंजूर करावी.
● ज्या शेतकर्यावर सरकारची मागील बाकी येणे आहे पण त्याच्याजवळ काहीच नाही अशा शेतकर्यास जर तो शेती करण्याची अजूनही उमेद धरत असेल तर त्यास सर्व प्रकारची मदत करावी. त्याच्यावरील कर्ज माफ़ करण्यासारखे असेल तर तसे कळवावे.
शेतकऱ्यांना सोईसवलती देणे, कर्जमाफ़ी देणे ही सेवा आहे पण शेतकरी कर्जबाजारी होऊ नये हे परिवर्तन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवले ते परिवर्तन आज घडण्यासाठी शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणांचा विचार करायला हवा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *