श्रमदान चळवळीचे तुफान आलया

आमिर  खान आणि  त्याच्या सहकारी वर्गाने पाणी फौंडेशन सोबत वॉटर कपच्या माध्यमातून महाराष्ट्रात जलसंधारणाच्या  कामाची एक चळवळ उभी केली आहे .  दिवसेंदिवस  गावामध्ये वाढत असलेल्या पाण्याची भीषण परिस्थिती पाहता, तसेच मागील बऱ्याच वर्षांपासून महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी उपाय योजना म्हणून जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात हाती घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आमिर खान आणि त्याच्या सहकारी वर्गाने जो पुढाकार घेतला तो खरंच कौतुकास्पद आहे .

सध्या महाराष्ट्रात वॉटर कपच्या माध्यमातून जे गावागावात जलसंधारणाची कामे उभी होत आहे , ते पाहून आता खरच जलसंधारणाच्या कामाचे ” तुफान  आलया ” म्हणायची वेळ आली आहे .  विदर्भ , मराठवाडा  आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागातील अनेक गावे वॉटर कपच्या स्पर्धेत सहभागी आहे . या स्पर्धेमुळे गावातील सर्वच थरातील मंडळी मोठया प्रमाणात जलसंधारणाच्या कामामध्ये सहभाग घेत आहे आणि श्रमदानाने कार्य करत आहे .  विशेष  म्हणजे या श्रमदानाच्या चळवळीत आता पर्यंत लाखोंच्या संख्येत लोकांनी श्रमदान केले आहे .

आज पुन्हां सिद्ध झाले आहे कि श्रमदान आणि लोक चळवळीतून मोठं मोठाले कार्य  सुद्धा सहज शक्य होऊ शकते . या वॉटर कपच्या माध्यमातून का होईना , आमिर खान  आणि त्याच्या सहकारी वर्गाने जे प्रामाणिक प्रयत्न सुरु  केले त्यासाठी त्यांना आपण नक्की सहकार्य केले  पाहिजे .  या जलसंधारणाच्या कामातून आपल्या महाराष्ट्राला पाण्याच्या दुष्काळातुन मुक्त करायला आपण सुद्धा श्रमदान केले पाहिजे .

 

सौजन्य : आपली माणसं

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *