शेतकऱ्यांच्या हाती दिल्या सरकारने तुरी

सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा तुरीचा प्रश्न फार गंभीर होऊन बसला आहे . कधी शेतकऱ्यांजवळ तुरीच्या पिकाचे उत्पादन पाहिजे तसे होत नाही आणि आता या वर्षी तुरीचे पीक मोठया प्रमाणात झाले तर तुरीला भाव नाही , तुरीचा भाव तर सोडाच सरकारने सुद्धा तूर खरेदी करणे बंद केले आहे . आपलं सरकार काहीही म्हणो पण यावर्षी तुरीच्या आणि इतर पिकाच्या  नियोजना  मध्ये सपशेल फेल ठरलं आहे .
इथे मात्र सरकार  नोटबंदी करून  त्याच नियोजनाच्या मोठ्या मोठ्या बाता  करतात पण इथे आपल्या  शेतकऱ्याची तूरबंदी करायला मागेपुढे न पाहता नियोजन शून्य काम या सरकारच सुरु आहे . ज्याच्या भरवश्यावर निवडून येते त्यालाच संपवायला निघाले आहे .

आपल्या सरकारकडे सातवे वेतन आयोग लागू करण्या करीत पैसा आहे , पण आपल्या शेतकऱ्यांचा पिकाला हमीभाव देण्याकरिता मात्र पैसे नाही . म्हणे सरकारने तुरीसाठी १००० करोड जाहीर केले आणि त्यात सुद्धा त्यांचे काही कार्यकर्ते बॅनर बाजी करून सरकारचे अभिनंदन करत आहे . अहो  हे तर सरकारच कर्तव्यच  आहे ते त्यांना करावंच लागेल .

इथे मात्र शेतकऱ्याची तूर कितीक दिवसापासून बाजार समितीमध्ये पडून आहे  आणि त्याच्या सोबतच शेतकऱ्यांना उपाशी पोटी  राहून तुरीच्या मागे उभे राहावं लागत आहे . पण सरकार मात्र नुसत्या शेतकऱ्यांच्या हाती  तुरी देत आहे , कि आमचा अभ्यास सुरु आहे कि  शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची  कि नाही

सौजन्य : आपली माणसं

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *