शेतकरी कर्जमाफीची निव्वळ Political Marketing

शेतकरी कर्जमाफीसाठी महाराष्ट्रात जोरदार आंदोलने झालीत, प्रथमच भारताच्या इतिहासामध्ये शेतकरी संपावर गेले होते आणि सरकारवर दबाव येऊन या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली. लगेच चौका-चौकात आपल्या नेते मंडळांनी राजकारण्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी करून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची लगेचच  Political Marketing करून सरकारचे स्वागत केले .

पण एक गोष्ट मात्र हि नेते मंडळी विसरले, ती म्हणजे कि कर्जमाफी झाल्यापासून किती शेतकऱ्यांना याच्या फायदा झाला , आतापर्यन्त किती शेतकरी कर्जमाफी साठी पात्र झाले, किती शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे फॉर्म भरले यासर्व गोष्टीची मात्र बॅनर बाजी किंवा मार्केटिंग कोणीच केली नाही .

बरेच शेतकरी खेडेगावातील असल्या कारणामुळे त्यांना कर्जमाफीच्या कॉम्पुटराइझ फॉर्म भरण्यासाठी फार अळथडे येते आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फॉर्म समजून सांगण्याकरिता मात्र सरकार कडून पाहिजे तशी मदत पण होत नाही आहे. राज्य सरकारकडे ना शेतकऱ्यांची संख्या आहे, ना यादी. काहीच नेमके नाही. अशात निकष ‘दीड लाख रुपयांपर्यंत’ करून गोंधळ आणखी वाढविला गेला. शेतकऱ्यांचा पुरता गोंधळला आहे . तसंच कर्जमाफीच्या निर्णयात अनेक जाचक अटी आणि शर्थी आहे. त्यामुळे 1,50 लाखांपर्यंतची मर्यादा नको, सरसकट कर्जमाफी हवी.

अश्या एक नाही तर अनेक प्रश्न या सरकारच्या कर्जमाफीने शेतकऱ्यांच्या करून ठेवल्या आहे आणि इकडे मात्र आपल्या सरकारचे नेते मंडळी शेतकरी कर्जमाफीची निव्वळ Political Marketing करण्यातचं पुढे आहे , पण इथे आपला शेतकरी रोज मरत असून सरकारच्या कर्जमाफीमुळे काहीच फरक जाणवत नाही आहे.

सौजन्य : आपली माणसं

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *