शेअर भाव वधारला मात्र शेतकरी कोसळला

एकीकडे शेअर  मार्केट मध्ये भाव चांगलाच वधारला  आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मालाचे भाव दिवसेंदिवस कोसळत आहे
ज्या कृषिप्रधान देशामध्ये आपले राजकर्ते निवडणुकी मध्ये शेतकऱ्याचे प्रश जनतेसमोर ठेऊन निवडणुकीमध्ये निवडून येतात ,
मात्र निवडून आल्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे . आपल्या देशामध्ये जरी उद्योगधंदे वाढत असले तरी शेती आणि त्यावरिल व्यवसाय मात्र सरकारचे साफ दुर्लक्ष होत आहे .

शेतकऱ्यांच्या  होणाऱ्या  आत्महत्या , शेती मालाला योग्य भाव नाही , शेतीचे जर जास्त उत्पादन वाढेल तर त्यावर सरकारच्या काहीच उपाय योजना नाही , येथे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. अश्या अनेक समस्यां शेतकरी वर्गा समोर उभ्या ठाकल्या आहे . पण सरकारचे मात्र यावर काहीच लक्ष नाही . दुसरीकडे या सरकारचे “अच्छे दिन ” हे फक्त बिसनेस वाल्यांसाठीच आले आहे कि काय असे वाटते .

आपले सरकार उद्योगधंदेना मोठ्या प्रमाणात वीज, पाणी आणि लागेल त्या सुविधा पुरवितात मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरिता सरकार चालढकल करत आहे , आज वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्याला शेती करणं सुद्धा महाग पडत आहे . कोरडवाहू , अल्पभूधार शेतकऱ्यांची  अवस्था तर फार  दयनीय झाली आहे , त्यांचा मुला बाळांचे भविष्य  आज या राजकर्त्यामुळे अंधारात पडले आहे . जर दिवसेंदिवस  असेच होत राहिले तर दर वर्षीच शेअर भाव वधारेल आणि   मात्र शेतकरी कोसळेल.

सौजन्य : आपली माणसं

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *