राजमाता राष्ट्रमाता हिंदवी स्वराज्यसंकल्पिका जिजाऊआउसाहेब

सर्व प्रथम राजमाता , हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजीराज्या सारख्या महापुरुषाला जन्म देणारी जन्मदाता जिजाऊसाहेब यांच्या दिनांक १२  जानेवारी जयंती निमित्य शत शत प्रणाम.

स्वाभिमानी, धाडसी, दृढनिश्चयी , अलोट धैर्याची, अनुपम शौर्याची व स्वराज्यस्थापनेची खरी शक्ती हि जिजामाताच होती. एक आदर्श कन्या, पत्नी, सून या माता ह्या चारही भूमिका जिजामातेने यशस्वीपणे  पार पडल्या. अत्यंत्य अवघड अश्या त्या काळात राजकारणातही तिने आपली असामान्य बुद्धिमत्ता प्रकट केली. सेवा , त्याग आणि झुंझारवृत्ती ह्यांनी तिच्या व्यक्तिमत्वाला एक आगळेच सामर्थ्य प्राप्त केले.

जिजाबाईंचे व्यक्तिमत्व कुठल्याही आकस्मित संकटाला तोंड देण्याची सिद्धता , वर्तमान राजकीय स्थितीचे आकलन , प्रत्येक  वेळी शिवबाच्या  पाठीशी उभे राहून त्यांना आमूलाग्र मार्गदर्शनाची दक्षता, अश्या सर्व गुण संपन्न राजमाता जिजाऊसाहेब होत्या .

आजच्या काळात विविध स्त्री-रत्नाचे तेजस्वी दाखले जगाच्या इतिहासात अनेक आहे. परंतु जिजाबाई मात्र त्या  सर्वापेक्षा वेगळी नि आगळी होत्या . ज्या महाराष्ट्रात अस्तिरता होती, तो महाराष्ट्र – संघटनेने मजबूत साधणारी ती अलौकिक स्त्री होऊन गेली . छत्रपती शिवाजीराज्या सारख्या महापुरुष  घडवले. हे इतिहास कधीही नाकारू शकत नाही . अश्या महान, थोर  राष्ट्रमाता  राजमाता  जिजाऊसाहेब यास मानाचा मुजरा !.
सौजन्य : आपली माणसं

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *