पाणी वाहतुकीसाठी ” वॉटर व्हील’

प्रा. वर्षा मरवाळीकर, डॉ. विलास टाकणखार

सध्याच्या काळात पाणीटंचाईमुळे टॅंकरवरून किंवा परिसरातील विहिरीवरून पाणी भरण्याचे काम कुटुंबातील महिला आणि शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींना करावे लागते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तसेच महिलांमध्ये मणक्याचे विकारही दिसू लागले आहेत. याचबरोबरीने श्रम आणि वेळही वाया जात आहे. हे लक्षात घेता पाणी वाहतुकीसाठी वेलो वॉटर व्हील फायदेशीर दिसून आले आहे.


पारंपरिक पद्धतीचे तोटे – 

– पारंपरिक पद्धतीमध्ये एकावेळी फक्त १५ लिटर पाणी डोक्‍यावरून वाहून नेले जाते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी अधिक चकरा महिलांना माराव्या लागतात. त्यामुळे त्यांना थकवा जाणवतो.
– डोक्‍यावरून पाणी वाहून नेल्यामुळे महिला व मुलींच्या आरोग्यावरही परिणाम दिसू लागले आहेत. संशोधनातून असे दिसून आले की, पारंपरिक पद्धतीने पाणी भरण्यामुळे मणक्‍यांचे विकार तसेच बाळंतपणावेळीच्या प्रक्रियेमध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची दाट शक्‍यता असते.
– कुटुंबाची पाण्याची गरज लक्षात घेता महिलांचा दिवसातील २५ टक्के वेळ हा पाणी आणण्यामध्ये जातो. सध्या तर हे प्रमाण ४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढलेले आहे.
– पाणी भरण्यासाठी काहीवेळा मुला-मुलींची मदत घेतली जाते. याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम दिसू लागला आहे.
– पाणी भरून आणतेवेळी घागरीवर तळहात ठेवला जातो. सातत्याने हात आणि पाण्याचा संपर्क आल्यामुळे पाणी अस्वच्छ होण्याचे प्रमाण वाढते.असे आहे वॉटर व्हील –
– पारंपरिक पद्धतीमध्ये ३ ते ५ वेळा चकरा मारून जेवढे पाणी आणले जाते ते वॉटर व्हीलचा वापर करून एकावेळी आणले जाते.
– उच्च प्रतीचे व मानवी आरोग्यास सुरक्षित असलेले प्लॅस्टिक वापरून वॉटर व्हील तयार केले आहे.
– वॉटर व्हीलचा हॅंडलची सोय असल्यामुळे पुढे ढकलण्याची किंवा ओढण्याच्या कृतीतून पाणी वाहून नेणे सोयीस्कर ठरते.
– पाणी भरतेवेळी व वाहून नेतेवेळी स्वच्छता राखली गेल्यामुळे पाण्यापासून होणारे आजार टाळता येतात.
– प्रत्येक कुटुंबाची पाणी भरण्यासाठी लागणाऱ्या वेळेत दिवसातील दोन तासांची बचत होते. कुटुंबातील व्यक्तीची प्रत्येक दिवशी होणारी जवळपास तीन किलोमीटरची पायपीट कमी होते.
– हे वॉटर व्हील कुठल्याही प्रकारच्या रस्त्यांवर चालविता येते.
– याच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक तक्रारी कमी होतात. वेळ, श्रमांची बचत होते. वॉटर व्हीलमुळे वेळ, श्रमाची बचत
सहा व्यक्तींचे कुटुंब, दोन जनावरे आणि परसबागेसाठी प्रति दिन लागणारे कमीत कमी पाणी ३०० लिटर. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता प्रति व्यक्ती ३५ लिटर, प्रति जनावर ४० लिटर आणि परसबागेसाठी १० लिटर पाण्याची गरज आहे.संपर्क – प्रा. वर्षा मरवाळीकर – ७५८८५२७५९५ (संपर्क वेळ (४ ते ५)
(कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर, जि. उस्मानाबाद)
सौजन्य : Agrowon

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *