… तर Private कंपन्या शेती करायला पुढे येतील !

 

दिवसेंदिवस शेती उत्पादनातं घट , वाढती महागाई आणि सरकारचे शेती बद्दल असलेले उदासीन धोरण या सर्व बाबीमुळे शेती हा व्यवसाय कठीण आणि खूप महागाईचा होत चालला आहे . तसेच या आधुनिक युगातील स्मार्ट पिढीला शेती या व्यवसायबद्दल ची नकारार्थी भावना मुळे शेती हा पिढीजात व्यवसाय लयास जाताना दिसून येत आहे .

शेतीमधल्या अनेक समस्या, सरकारचे उदासीन धोरण , शेती मालाला योग्य बाजारपेठ नाही या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्याची पिढी शेती न करता इतर व्यवसाय , नौकरी तसेच उद्योगधंद्या वळत आहे . अश्या या प्रकारामुळे शेती हा व्यवसाय डबघाईस आला आहे आणि या व्यवसायाला कुणीच वाली उरला नाही आहे . आजच्या पिढीमध्ये शेतकऱ्याचा मुलगा शेती करेलच याची शाश्वती नाही .

शेतीबद्दल च्या या सर्व बाबी लक्षात घेता त्यावर योग्य ते पावले उचलल्या गेली नाही तर मात्र नजीकच्या काळात Private कंपन्या आपली शेती Contract ship  मध्ये घेऊन शेती करायला पुढे येतील आणि मग या Private कंपन्या आपल्याच शेतीतून उत्पन्न काढून आपल्याच उरावर बसतील . अजूनही वेळ गेली नाही , शेती सोबत इतर व्यवसाय किंवा उद्योगधंदा करावाच लागेल आणि कुठल्याही सरकार वर आणि त्यांचा योजनेवर अवलंबून न राहता शेती मध्ये बदल करून हा शेती व्यवसाय पिकला पाहिजे व टिकला पाहिजे .

सौजन्य :आपली माणसं

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *