जलसंधारणाची चळवळ मजबूत करायला वॉटर कप स्पर्धेसाठी सज्ज राहा

जलसंधारणाची  चळवळ मजबूत करण्याकरिता पाणी फाऊंडेशनच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेसाठी  महाराष्ट्रातील ३० तालुक्यांमध्ये ८ एप्रिल २०१७ ते २२ मे २०१७ ला दरम्यान हि स्पर्धा घेण्यात  येणार असून त्यासाठीचा प्रशिक्षणांनाही प्रारंभ  झाला  आहे.

चित्रपट अभिनेता आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांच्या पुढाकारातून पानी फाउंडेशनची सुरवात करण्यात आली . महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी पानी फाउंडेशने जलसंधारणाची  चळवळ  हाती घेतली आहे . लोकसहभागातून जलसंधारणाची कामे व्हावी आणि त्याचा गावालाच लाभ व्हावा यासाठी दरवर्षी वॉटर कॅपचे आयोजन करण्यात येत आहे . यंदा ८ एप्रिल पासून  या स्पर्धेला सुरवात होत असुण राज्यातील ३०  तालुक्यातील तब्बल २०१४ गवे या स्पर्धेत सहभागी होणार आहे .
स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना लोकसहभागातून जलसंधारणाची विविध कामे करावयाची आहे .  यामध्ये शोषखड्डे  किंवा झाडासाठी खड्डे तयार करणे , पाणी थांबवणे  आणि साठवणे यासाठी बंधारे बांधणे , जुन्या बांधकामाची दुरुस्त करणे अशी विविध  कामे करावयाची आहे .. मुल्यांकनासाठी १०० गुण ठरविण्यात आले असून  विविध मुद्याच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे . अभिनेता आमिर खान देखील विविध ठिकाणी  भेटी  देणार  असल्याची  माहिती  मिळाली  आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *