चला खेड्याकडे – एक स्वयंपूर्ण आणि “Smart village model” बनवू या

दिवसेंदिवस शहराचा वाढता भार आणि त्याच्या अगणित समस्या, त्यापासून मुक्ती देण्याकरिता “चला खेड्याकडे “ चा नारा द्यायची आता वेळ आली आहे. परंतु त्यासाठी आपल्याला “स्वयंपूर्ण व्हिलेज मॉडेल” सारखे प्रकल्प साकारायला हवे.

महात्मा  गांधींनी ६० वर्षांपूर्वी एक असा नारा दिला होता कि तो आज आपल्याला परत द्यायला परावृत्त करत आहे, तो म्हणजे “चला खेड्याकडे “.  खेड्या-गावाची आज  परिस्तिथी बघता असे लक्षात येत आहे कि, शेतकऱ्याची स्थिती फार गंभीर होत आहे , विशेष करून कोरडवाहू शेतकरी, तरुण वर्ग  रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहे, आज हे असेच चालत राहिले तर एक दिवस खेड्या-गावाची सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थिती फार बिकट होऊन जाईल आणि त्याचा सर्व भर शहरांवर येईल.

आपली माणसं हि संस्था स्वयंपूर्ण व्हिलेज मॉडेल च्या माध्यमातून चला खेड्याकडे या नारा द्वारे एक परिपूर्ण गावाची संकल्पना मांडत आहे. तसेच स्वयंपूर्ण व्हिलेज मॉडेल तथा Smart Village  करण्याकरिता एक छोटासा प्रयन्त हाती घेत आहे, आणि हे लोक सहभागाशिवाय शक्य नाही. जर जास्तीत जास्त लोक यात सहभागी झाले तर  ” स्वयंपूर्ण व्हिलेज मॉडेल ” सारखे प्रकल्प साकारायला वेळ लागणार नाही , यात आपण सरकारी तसेच प्रशासकीय मदत तर नक्की घेऊ पण कुठलीही चळवळ लोक सहभाग शिवाय होत नाही.

” चला खेड्याकडे “ या मोहिमेच्या माध्यमातून आपण पुन्हा खेड्या-गावाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक वैभव परत मिळवून देऊ या आणि खेड्या-गावाना स्वयंपूर्ण बनवू या.

चला तर आपण आपल्या गावांना – खेड्यापांड्याना एक स्वयंपूर्ण आणि  “Self Sustainable village model” बनवू या आणि
महात्मा गांधींचा नारा “खेड्याकडे चला ” हा पुन्हा एकदा सिद्ध करूया .

Join us  &  Donate us

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *