गड-किल्ल्याची तटबंदी केव्हा होणार

शिव छत्रपती चे नाव घेताच आपल्याला गड-किल्ल्याची आठवण होते. पण सध्याच्या स्तिथीत महाराष्ट्रातील गड-किल्लेची अवस्था फार बिकट झाली आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी  आणि त्याच्या मावळ्यांनी गड-किल्ल्यासाठी आपलं रक्त सांडवले आणि प्राणाची आहुती दिली. त्यांचा या बलिदानाचा आपण  काय  अवस्था करून ठेवली आहे.

नुकतेच  महाराष्ट्र  सरकार  ने शिव छत्रपतीच्या स्मारकासाठी लाखो-करोडो  रुपये जाहीर केले, त्या बद्दल नक्कीच त्यांचं अभिनंदन करायला हवे. पण  मनात कुठेतरी  खंत राहून जाते कि आपल्या शिव छत्रपती राजांचे गड-किल्लेची अवस्था पाहुंन फार वाईट वाटते .  महाराष्ट्र  सरकार  ने गड-किल्ल्याची तटबंदी, डागडुजी  तसेच प्रत्येक गडावर एक पहारेकरी  किंवा गडकरी व देखभाल करण्याकरिता मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यायला हवा.
तरच  कुठे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्याची तटबंदी हि चिरेबंदी राहील आणि आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा त्यांच्या या लौकिक इतिहासाची साक्ष मिळेल.

सौजन्य – आपली माणसं.

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *