ऑरेन्ज झाला आता “महाऑरेन्ज”

संत्रा पिकवणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना संत्राला चांगला भाव मिळावा, योग्य बाजारपेठ मिळावी , त्यांच्या मालाचं ब्रॅण्डिंग होऊन परदेशात जावा , हि प्रत्येक  संत्रा पिकवणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांची इच्छा असते . या सर्व गोष्टी “महाऑरेन्ज” या कंपनीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या .
इतके वर्ष मोर्शी तालुक्यातील ‘मायवाडी ‘ येथील संत्रा प्रक्रिया करणारा उद्योग सरकारच्या उदासीन धोरणामुळे बंद पडून होता . विशेष  म्हणजे या संत्रा प्रक्रिया कारखानाच्या मशीनरी धूळ खात पडल्या होता .  पण  “महाऑरेन्ज” या कंपनीने  संत्रा प्रक्रिया करणारा उद्योगाला सरकार कडून भाडेतत्वावर ‘ना  नफा ना तोटा ‘ या धर्तीवर चालवायला घेतला आहे आणि  संत्रा पिकवणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांना चांगला फायदा करून दिला .

या  संत्रा प्रक्रिया उद्योगामुळे संत्रा या मालाची चांगल्या प्रकारे ब्रॅण्डिंग करून त्याला चांगला भाव बाजारपेठेत मिळत आहे . आणि हा माल मोठ्या प्रमाणात परराज्यात व परदेशातही पाठवला जात आहे .  “महाऑरेन्ज” तर्फे संत्रा खरेदी करण्याकरिता देशभरातून व्यापाऱ्यांना शेतकर्यांचा संत्रा माल विकत घेण्याकरिता प्रोसाहित करत आहे. जेणे करून शेतकऱ्यांचा माल या “महाऑरेन्ज” संत्रा प्रक्रिया उद्योगातून मोठया प्रमाणात व्यापारी वर्ग  योग्य भावात खरेदी करू शकेल आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना  होईल .

ज्या प्रकारे “महाऑरेन्ज” ने शेतकऱ्याच्या फायद्यासाठी संत्रा प्रक्रिया उद्योगाला सुरु  करून  एक प्रकारे गती  देण्याचे महत्वाचे काम  केले असून , नक्कीच “महाऑरेन्ज” या कंपनीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे . आता  केंद्र आणि राज्य सरकारने पुढे येऊन अश्या प्रकारचे संत्रा प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु करावे .

सौजन्य: आपली माणसं

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *