आरक्षण – कोरडवाहू शेतकऱ्यांना द्या

आरक्षण या एका मागणीवरून सध्या महाराष्ट्र भर अलीकडे फार मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहे. आरक्षण कोणाला द्यायला पाहिजे किंवा कुठल्या जातीला किती आरक्षण   दिले पाहिजे, असे  बरेच प्रश्न सध्या सरकार पुढे  आहे . भारताला आज स्वतंत्र भेटून बरेच वर्ष झाली आहे तरी सुध्या आरक्षण सारख्या विषयावर बरीच चर्च्या, वाद विवाद  आणि मोट्या प्रमाणात जाती- जाती मध्ये
मतभेत  आहे.

बरेच जाणकारांच्या आणि टीकाकारांच्या  म्हणन्यानुसार आरक्षण हे एखाद्या जातीपुरते न राहता त्यात इतर जातींचा समावेश करून द्यायला पाहिजे. तसेच  प्रत्येक जातीचे वर्ग आरक्षणा च्या मागणीवरून भव्य मोर्चे काढून त्यांचा मागण्या सरकार पुढे ठेवत  आहे. खरतर आजच्या स्थितीला  आरक्षणा ची गरज आहे ती कोरडवाहू शेतकऱ्यांना,  शेतमजुरांना आणि गोर गरिबांना .

जो देश शेतीप्रधान असून, ज्या देशाची लोकसंख्या मोट्या प्रमाणात शेती व्यवसायावर  अवलंबून आहे आणि ज्या देशात शेतकऱयांच्या मतावर निवडणुकीत आपले नेते निवडून येतात. तो शेतकरी वर्ग आज आत्महत्या  करण्यास मजबूर आहे, अश्या कोरडवाहू शेतकऱ्यांना या सरकारनी आरक्षण नक्कीच द्यायला पाहिजे.

ज्या कोरडवाहू शेतकऱ्यांना सर्वस्वी निसर्गावर अवलंबून राहावं लागत. ज्यांच्या मालाला सरकार योग्य  बाजार भाव देणं नाही अश्या कोरडवाहू शेतकऱ्यांना या सरकारनी आरक्षण नक्कीच द्यायला पाहिजे. कोरडवाहू शेतकरी, शेत मजूर आणि गोरगरिबांना सरकारने  आरक्षण जाहीर करून त्यांचा मुला-बाळांचे , त्यांचा आया-बहिणीहचे जीवन सार्थकी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा हीच अपेक्षा.

सौजन्य – आपली माणसं.

3 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *